text
stringlengths 0
147
|
---|
महाराजांचे मोरोपंत पिंगळे, बाळाजीपंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्रपंत अमात्य, रघुनाथपंत |
पंडित इ. अष्टप्रधान तयारीनिशी राजवाड्यात दाखल झाले. मावळचे मुख्य अन् मातब्बर |
<<< |
देशमुख आणि देशपांडेही आले. महालात तीन सुवर्णचौरंग मांडण्यात आले होते. राजपुत्र |
संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाईंसोबत महाराज महालात प्रवेशले. त्यांनी सोवळे |
नेसले होते. गागाभट्टांनी अष्टप्रधानांना वेगवेगळ्या नियोजित ठिकाणी उभे राहण्यास |
सांगितले. त्याप्रमाणे मोरोपंत पेशवे तुपाने भरलेला सुवर्णकलश घेऊन महाराजांच्या पूर्वेस, |
रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला ताम्रकलश घेऊन पश्चिमेस, रघुनाथ पंडितराव मधाने |
भरलेला सुवर्णकलश घेऊन उत्तरेस तर दक्षिणेस हंबीरराव मोहिते सरसेनापती दुधाने |
भरलेला रौप्यकलश घेऊन उभे राहिले. महाराजांच्या आग्नेयेला अण्णाजी दत्तो सचिव छत्र |
घेऊन उभे होते. नैऋत्येस त्र्यंबकपंत डबीर पंखा घेऊन उभे होते. वायव्येला दत्ताजीपंत मंत्री |
मोर्चेल घेऊन तर ईशान्येस निराजी रावजी न्यायाधीश दुसरे मोर्चेल धरून उभे होते. जवळच |
निरनिराळ्या हंड्यांमध्ये तीनही सागरांचे जल, सप्तगंगांचे जल साठवून ठेवले होते. |
राजपुरोहित मंत्र म्हणत होते. गागाभट्टांनी महाराजांना, युवराजांना अन् महाराणींना पवित्र |
जलाचा अभिषेक घालायला सुरुवात केली. सप्तगंगांच्या पाठोपाठ समुद्रस्नानही झाले. |
उष्णोदकांचे घट महाराजांच्या मस्तकावर रीते होऊ लागले. त्यापाठोपाठ गागाभट्टांनी |
अष्टप्रधानांच्या हातातील दूध, दही, तूप, मध अशा पदार्थांचीही अभिषेकधार धरली. प्रत्येक |
अभिषेक होताना उच्चस्वरात मंत्रघोष कानी पडत होता. काही वेळातच 'अभिषेक' पूर्ण |
झाला. गागाभट्टांनी महाराजांना राजवेश परिधान करून राजसभेत यायला सांगितले. |
'राज्याभिषेक' पूर्ण झाला. आता होणार होते 'सिंहासनारोहण'. |
अभिषेक झाल्यावर महाराज आपल्या महालात आले. त्यांनी आपला राजवेश परिधान |
केला. यावेळेस महाराजांनी आपल्या अंगात पांढऱ्या शुभ्र रंगाचा अंगरखा घातला होता. |
पायी पांढरी सुरवार घातली होती. डोक्यावर जिरेटोप व त्यावर केशरी रंगाचा मंदिल अथवा |
किमाँश बांधलेला होता. मंदिलाच्या टोकातून अत्यंत तेजस्वी अशा मोत्यांचा तुरा व मोत्यांची |
माळ खोवलेली होती. हाताच्या अस्तन्या सारलेल्या होत्या. मनगटात सुवर्णाची पोहोची व |
सुवर्णकडी शोभत होती. कमरेला केशरी दुपट्टा बांधलेला होता, अन् त्यातच महाराजांच्या |
लाडक्या 'भवानी' फिरंगीचा गोफ अडकवला होता. गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या अन् |
त्यावर पांढऱ्या शुभ्र कवड्यांची जगदंबा भवानीची माळ होती. महाराजांच्या कपाळावर |
कुंकवाची चंद्रकोर रेखाटली होती. त्यावर 'शिवगंध' होते. कानात मोत्यांचा चौकडा झुलत |
होता. असे ते अत्यंत तेजस्वी 'शिवरूप' होते. महाराज राजवाड्याच्या अंगणात आले. |
महाराणी सोयराबाईसाहेब आणि युवराज संभाजीराजेही आले. नंतर तिघांनी कुलदेवतेचे |
दर्शन घेतले व आऊसाहेब जिजाऊंच्या पाया पडून महाराज पालखी दरवाज्याने |
होळीमाळावरून राजसभेच्या महादरवाज्याकडे निघाले. महाराजांच्या पाठीमागे अष्टप्रधान |
मंडळ व खाशी माणसे होती. महाराज राजसभेच्या महाद्वारापाशी येताच शृंगारून ठेवलेल्या |
त्या शुभलक्षणी हत्तींनी सोंड उंचावून महाराजांना वंदन केलं. त्याचबरोबर तिथे उभ्या |
असलेल्या पहारेकऱ्यांनी आणि हाती सुवर्णदंड घेतलेल्या प्रतिहारींनी महाराजांना मुजरे केले. |
त्यांचे मुजरे स्वीकारून महाराज त्या उत्तुंग अशा महाद्वारातून आत प्रवेशले. महाराजांनी |
महाद्वारात पाऊल ठेवताच वरच्या नगारखान्यातला चौघडा झणाणू लागला. |
<<< |
नौबतीवर टिपरी पडली. आतला राजसभेचा प्राकार तर झेंडूच्या फुलासारखा माणसांनी |
गच्च भरून गेला होता. प्रत्येकजण नटून-थटून आपल्या राजाचे दर्शन घ्यायला उत्सुक होता. |
राजसभेच्या दरवाज्याच्या बरोबर समोर, सरळ रेषेत एक उंच चौथरा बांधण्यात आला होता. |
त्या चौथऱ्यावर सुंदर नक्षीकाम केलेल्या अष्टखांबांची सुंदर मेघडंबरी होती. या मेघडंबरीच्या |
खाली बत्तीस मण सोन्याचे सिंहासन झळाळत होते. सिंहासनावर अनेक शुभचिन्हे कोरली |
होती. त्याचबरोबर राजसभेच्या प्रचंड गर्दीतही चौथऱ्यावरचे भाल्याच्या टोकांवर तोललेले |
'न्याय प्रतिष्ठा' जपणारे सोन्याचे तराजू, दुसऱ्या भाल्यांच्या टोकांवर असलेला उघड्या |
दातांचा सोन्याचा मासा म्हणजेच 'माहिमरातब'. घोडदळाचे सामर्थ्य दर्शवणारे अखपुच्छ |
असणारे भाले, सोन्याचा राजदंड, नक्षत्रमाळा अन् मौक्तिकमाळा, शिवाय अनेक मोर्चेले, |
पंखे, चवऱ्या, अब्दागिऱ्या इ. राजचिन्हे उठून दिसत होती. सिंहासनावरच्या मेघडंबरीच्या |
खांबांना सुंदर कनाती आणि झालरदार पड़दे लावण्यात आले होते. |
राजसभेच्या महाद्वारापासून सिंहासन चौथऱ्याच्या पायऱ्यांपर्यंत लाल मखमली |
पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या मार्गावर बरोबर मध्यभागी हिरोजी इंदुलकरांनी एक |
सुंदर कारंज तयार केलं होतं. जेणेकरून महाराज या मार्गावरून जाताना थंडगार पाण्याचे |
सहस्रावधी तुषार महाराजांवर फवारले जातील. समोरच्या राज सिंहासनापाशी गागाभट्ट, |
बाळंभट्ट राजोपाध्ये व इतर ब्रह्मवृंद सगळ्या तयारीनिशी आले होते. पहाटेची रम्य वेळ होती. |
पश्चिमेकडे अंधाराचे गडद साम्राज्य पसले असताना पूर्व क्षितिजावर हळूहळू पांढरा रंग |
पसरू लागला होता. राज्यारोहणाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. साऱ्या सभेचे लक्ष |
आता महाराजांच्या येण्याकडे लागले होते. इतक्यात नगारे वाजू लागले. राजसभेच्या माना |
उंचावल्या गेल्या. प्रथम दोन प्रतिहारी राजसभेत प्रवेशले आणि त्यांच्यामागून एका हातात |
धनुष्य घेऊन अन् दुसऱ्या हातात सोन्याची विष्णूची मूर्ती घेतलेले महाराज राजसभेत |
प्रवेशले. शांत, धीरगंभीर पावले टाकत, महाराज अष्टप्रधानांसह सिंहासन चौथऱ्याजवळ |
येऊन पोहोचले. सिंहासन चौथऱ्याच्या पायथ्याला उभे राहून त्या सोपानाकडे पाहताना |
महाराजांना काय वाटलं असेल? 'आजपर्यंत आपण केलेल्या प्रवासाचा सोपान आजच्या |
दिवसापर्यंत येऊन पोहोचेपर्यंत आपल्या कितीतरी जिवलगांनी प्राणांच्या आहुत्या दिल्या. हा |
अभिषेक माझा नाही, त्यांचा आहे.' महाराजांना त्या साऱ्या सवंगड्यांचं स्मरण नक्कीच |
झालं असेल. सावकाश पायऱ्या चढून महाराज सिंहासन चौथऱ्यावर पोहोचले. गागाभट्टांनी |
आपल्या हातातला सोन्याचा राजदंड महाराजांच्या हातात दिला. महाराजांनी शपथ घेतली, |
"या पुत्र म्हणून मी या भूमीचं व प्रजेचं पालन करीन. जर मला करणं |
शक्य झालं नाही तर या सिंहासनाचा स्वतःहून त्याग करीन." शपथविधी पूर्ण झाला. |
गागाभट्टांनी मंत्रोच्चारांचा घोष करत महाराजांना सिंहासनावर बसण्याची खूप केली. |
महाराजांनी प्रथम सिंहासनाला वंदन केलं. आपल्या पायातल्या मोजड्या एका बाजूला |
काढून ठेवल्या. आपली अत्यंत आवडीची 'भवानी फिरंग' महाराजांच्या जवळच असलेल्या |
विश्वासराव गायकवाड या सरदाराच्या हातात दिली आणि मग राजसभेकडे तोंड करून |
पाठमोरे जात सिंहासनाला पदस्पर्श जराही न करता महाराज सिंहासनावर आसनस्थ झाले. |
<<< |
"दक्षिणची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहिली पाहिजे !!! " |
- छत्रपती शिवाजी महाराज |
दि. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. अन् |
हिंदुस्थानातीलच नव्हे तर हिंदुस्थानाबाहेरीलही तमाम परकीय सत्ताधीशांचे आणि |
सुलतानांचे डोळे खाड्कन उघडले. मोगल बादशहा मोईउद्दीन 'औरंगजेब' तर फारच |
खवळला. तो तख्तावर बसल्यापासून शिवाजीची ही ‘शरारत' रोखण्याचे प्रयत्न करत होता. |
शिवाजीवर सोडलेले सारे सरदार मार खाऊनच परत येत होते. एकट्या मिर्झाराजे |
जयसिंहांनी चांगली कामगिरी केली म्हणावं तर शिवाजीने येऊन खुद्द |
आपल्याला हातोहात बनवलं !! आता आपण स्वतः जातीनिशी दख्खनेत उतरून, मोंगल |
सामर्थ्याच्या संपूर्ण शक्तिनिशी शिवाजीचे हे मूळ कायमचे उखडून टाकायला हवे हे |
औरंगजेबाला कळून चुकले होते. आजपर्यंत शिवाजी हा एक मामूली जहागीरदार बंडखोर |
होता. परंतु काशीच्या काफर पंडिताने त्याला राजा केलं, सिंहासन दिलं. इ. स. १५७५ च्या |
विजयनगरम्च्या अस्ताबरोबरच नष्ट झालेलं हिंदूंचं साम्राज्य आज पुन्हा बरोबर शंभर |
वर्षांनंतर झळाळून उठलं होतं. अर्थात या साऱ्या गोष्टी इकडे शिवाजी महाराजांनाही समजत |
होत्याच! खवळलेला औरंगजेब आता लवकरात लवकर दख्खनवर चाल करून येणार हे |
महाराज पुरते जाणून होते. |
या वेळेस दख्खनेत स्वराज्याच्या व्यतिरिक्त विजापूरची आदिलशाही आणि |
गोवळकोंड्याची कुतुबशाही या दोन 'बहमनी' शाह्या अजूनही जिवंत होत्या. औरंगजेब |
दख्खनेत उतरण्याची चिन्हं दिसू लागल्याने, अन् त्याच्याशी लढणे हे एकट्या |
मराठ्यांना शक्य नसल्याने महाराजांनी राजकारणाचा एक नवीनच डाव मांडला. औरंग हा |
जरी मुसलमान असला तरीही, कितीही केलं तरी तो तैमूरलंग अन् चंगिझखानाचा वंशज |