text
stringlengths
0
147
Peshwaai
पेशवाई ... पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णपानच. थोरल्या महाराज
श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या अस्तानंतर आता स्वराज्य नामशेष होणार की
काय अशी भीती वाटत असतानाच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्न पडले! बाळाजी विश्वनाथ
भट ...
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राची जी वाताहात झाली होती, मोगली फौजांनी
महाराष्ट्राची जी वाट लावली होती, तेच चित्र अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पालटू लागले.
इ. स. १७०७ मध्ये शाहजादा आझमशहाच्या कैदेतून सुटून शाहूराजे महाराष्ट्रात आल्यानंतर
हाच आपला खरा राजा आहे हे अचूक ओळखून बाळाजीपंतांनी आपले संपूर्ण आयुष्यच
शाहूराजांच्या सेवेत अर्पण केले. बाळाजी विश्वनाथांसारख्या 'अतुल पराक्रमी सेवका' ची ती
प्रेमळ राजनिष्ठा पाहून शाहूराजेही भारावून गेले. त्यांनी बाळाजीपंतांना स्वराज्याचे पेशवेपद
बहाल केले.
बालाजी विश्वनाथ पेशव्यांनी तीस वर्षे मोगलांच्या कैदेत खितपत असलेल्या
राजघराण्यातील कबिल्याची अन् असामींची सुटका केली आणि त्याशिवाय स्वराज्याचे 'पोट
भरावे' यासाठी राजकारणं करून चतुराईने दिल्ली दरबारातून चौथाई- सरदेशमुखीच्या
सनदाही मिळवल्या. या सनदा म्हणजे भविष्यातील पातशाहीला नामोहरम करण्याची पहिली
पायरी होती.
बालाजी विश्वनाथांनंतर त्यांच्याइतक्याच हुशार, कर्तबगार आणि पराक्रमी असणाऱ्या
त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला, बाजीरावांना दरबारातील अनेक मंत्र्यांचा विरोध असतानाही शाहू
महाराजांनी पेशवेपदी नेमले. बाजीरावांनीही शाहूराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळ तीस वर्षांच्या काळातच मराठी फौजा थेट दिल्लीवर जाऊन
धडकल्या. पेशव्यांच्या या 'झंझावाती' फौजांना अडवण्याची हिंमत आता एकाही यवनी
पातशाहीत उरली नव्हती. परंतु केवळ दुर्दैवाने वयाच्या केवळ अवघ्या चाळीसाव्या वर्षी हा
पराक्रमी पेशवा जग सोडून गेला ...
<<<
बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी नानासाहेब ऊर्फ बाळाजी बाजीराव यांना
पेशवेपद दिले. नानासाहेब वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षापासून साताऱ्यात राहून
राज्यकारभाराचे घेत असल्याने, शाहू राजांची त्यांच्यावर फार मर्जी होती. इ.स. १७४९
मध्ये शाहू राजांनी आपल्या मृत्यूपूर्वी राज्याची सारी जबाबदारी आणि राज्यकारभाराचे सारे
हक्क फक्त पेशव्यांना बहाल केले. त्यामुळे छत्रपतींऐवजी पेशवे आता महाराष्ट्राचे सार्वभौम
परंतु अनभिषिक्त राज्यकर्ते झाले. मराठ्यांची कागदोपत्री राजधानी म्हणून 'सातारा' असले
तरीही पुण्याच्या 'शनिवारवाड्याला' अधिक महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांच्या खड़्गाची अन्
शनिवारवाड्याच्या फडाची कीर्त साऱ्या शत्रूंच्या उरात भरवत होती. परंतु १७६१ च्या
झालेल्या प्रचंड नरसंहारानंतर केवळ पाच महिन्यातच नानासाहेब जग सोडून
गेले. नानासाहेबांचा थोरला पुत्र विश्वासराव पानिपतावर पडला असल्याने त्यांच्या द्वितीय
पुत्रावर- माधवरावावर वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी पडली. या
तरुण पेशव्याने आपल्या चुलत्याच्या राज्यलालसेला आणि परकीय शत्रूंना प्रसंगी चुचकारून
वा प्रसंगी धाक दाखवून नियंत्रणात ठेवले आणि वयाची सत्तावीस वर्षे पूर्ण होतात न होतात
तोच माधवरावही दौलतीला पारखे झाले.
माधवरावसाहेबांचा मृत्यू ही जणू मराठी सत्तेच्या उतरत्या कळेची नांदी होती. 'परशुराम
चरित्र' या ग्रंथाचा कवी वल्लभदास याने तर बाळाजी विश्वनाथांच्या रूपाने परशुराम या
पृथ्वीवर पुन्हा अवतरले आणि आता माधवरावांच्या मृत्यूने भार्गवरामाचाही अवतार संपला
असेच सूचित केले आहे. कारण माधवरावांनंतरच्या एकाही पेशव्याच्या हातात राज्याची
संपूर्ण मुखत्यारी कधीही राहिली नाही. तसं म्हटलं तर खरी 'पेशवाई' ही केवळ बावीस वर्षेच
होती. कारण इ. स. १७५० मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत पेशव्यांना महत्त्व असले तरी ते
'सार्वभौम' नव्हते आणि यानंतरच्या काळात, इ. स. १७७२ मध्ये माधवरावांचा मृत्यू
झाल्यानंतर बारभाई कारस्थानापासून पेशवेपद हे कोणालाही मिळाले तरी सारे राज्य
'कारभारी' च पाहत असत. नारायणराव आणि सवाई माधवरावांच्या काळात सारा कारभार
नाना फडणवीस आणि महादजी शिंदेच बघत होते. पुढे बाजीराव पेशव्यांनी काही काळ
स्वतः कारभार पाहिला, परंतु या काळात राज्याचे काहीही भले न होता नुकसानच झाले.
अखेरच्या काळातही त्रिंबकजी डेंगळ्यांसारखे कारभारीच राज्य चालवत होते. परंतु, तरीही
एकूणच पाहता या कारभाऱ्यांनीही 'राज्य' उत्तमरीत्या सांभाळले आणि विस्तार केला यात
तिळमात्रही शंका नाही.
आज पेशवाई आणि पेशव्यांबाबत जनमानसात प्रचंड गैरसमज पसरले आहेत. या
गैरसमजांमुळेच अनेक लोकांना (आणि इतिहासकारांनाही) पेशवाई ही 'मोगलाई'पेक्षाही
वाईट वाटते. यात इतर अनेक तांत्रिक आणि वैचारिक गोष्टी असल्या तरीही याचे मुख्य
कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले जातीयवादाचे विष !! पेशवे हे
ब्राह्मण होते आणि केवळ याच कारणाने आजपर्यंत स्वतःला ‘सेक्युलर' म्हणवणाऱ्या
इतिहासकारांनीही पेशव्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन न करता त्यांची कायम अवहेलनाच
केली. इतिहासकारांचा असा आक्षेप आहे की, पेशवाईतच 'जातीय निर्माण झाली. परंतु
<<<
एका अस्सल समकालीन पत्रातून यासंबंधी बरीच कल्पना येते "खावंदांचे (पेशव्यांचे) घरी
सर्व लहान-मोठे आहेत, बरे-वाईट आहेत परंतु आपपरत्वे जातीचा अभिमान हा काही एक
नसावा. सर्वही खावंदांची लेकरे. आम्ही (सर्व) सेवक हे जाणतो की देशस्थ, कोकणस्थ,
कऱ्हाडे, प्रभू, शेणवी, मराठे (इ.) सर्व स्वामींचे. स्वामी इतक्यांचे मायबाप. चाकरी मात्र
सर्वांनी करावी. जातीभेद अभिमान नसावे." सरदार नाना पुरंदरे यांच्या या
पत्रावरूनच तत्कालीन व्यवस्थेत, निदान स्वतः पेशव्यांच्या आचरणात जातीभेद नव्हता
स्पष्ट दिसून येते. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आणि सवाई माधवरावांच्या काळात
'रमण्यां' वर फार खर्च केला जात होता ही गोष्ट खरी असली तरीही ब्राह्मण नाही म्हणून
एखाद्यावर अन्याय केला जात होता हा शुद्ध गैरसमज आहे.
श्रीमंत दुसऱ्या बाजीरावांच्या काळात उलथापालथ झाली. त्यांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना
आपला मुख्य कारभारी बनवलं. या त्रिंबकजींना मराठी माणसांनी तोंडभरून शिव्या दिल्या,
परंतु त्यांचा कट्टर शत्रु, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्यांच्याविषयी म्हणतो- " ... मराठ्यांशी युद्ध
पुकारण्यापूर्वी त्रिंबकजीला कारभारी पदावरून खाली ओढलं पाहिजे. पेशवाईचा खरा
सूत्रधार त्रिंबकजी डेंगळे आहे. त्याला दूर केल्याशिवाय आपला कोणताही कार्यभाग
साधणार नाही. पण त्रिंबकजीचा कुठल्यातरी कटाशी संबंध जोडल्याखेरीज ही संधी कशी
मिळणार याची मला चिंता आहे." आता एल्फिन्स्टनसारखा बुद्धिमान कट्टर
डेंगळ्यांचं कौतुक करत असताना आमच्याच माणसांनी त्यांच्यावर चिखल उडवण्याचं पाप
केलं यात नवल काहीच नाही
पेशवाईबद्दलचं माझं हे लिखाण म्हणजे समग्र पेशवाईचा इतिहास नक्कीच नाही. मी
स्वतः कोणी इतिहासकार अथवा इतिहास संशोधक नाही. केवळ एक लहानसा अभ्यासक
आहे. जगात एकासारखा दुसरा माणूस होणे केवळ अशक्य आहे. थोरल्या छत्रपती श्री
शिवाजी महाराजांच्या तोडीचा नंतर जन्मला नाही. तो जन्माला येणं शक्यही नाही.
त्यांच्यानंतर महाराष्ट्रात काही शूर, पराक्रमी आणि उदार असे पुरुष झाले. शिवाजी
महाराजांच्या मृत्यूनंतर दोन तपांच्या काळातच बाळाजी विश्वनाथांचा उदय झाला आणि
त्यांच्या पराक्रमी वंशजांनी शिवरायांचे 'हिंदवी स्वराज्याचे' स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण केले.
वास्तविक पाहता लो. टिळक म्हणाले त्याप्रमाणे 'पेशव्यांच्या अतुल पराक्रमाने मराठी
राज्याचा मृत्यू शंभर वर्षांच्या एका दिवसाने लांबणीवर पडला' हीच अत्यंत सुदैवाची गोष्ट
होती. परंतु महाराष्ट्राने मात्र पेशव्यांना कायमच उपेक्षित ठेवलं. काही स्वार्थी लोकांनी तर
शिवशाहीला 'मराठेशाही' आणि पेशवाईला 'ब्राह्मणशाही' अशी विशेषणं बहाल केली.
यातूनच पुढे जातीयवादाची ठिणगी आणखीनच शिलगावली गेली.
पेशव्यांबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. अन् म्हणूनच पेशवाईची तोंडओळख
आणि त्यांच्याबद्दलचे जनमानसात असणारे गैरसमज दूर करण्याचा माझा हा मनापासून
केलेला लहानसा प्रयत्न आहे. हे पुस्तक परिपूर्ण आहे असा माझा अजिबात दावा नाही.
किंबहुना, आजही हजारों कागद धूळ खात पडून आहेत. ते उजेडात आले की कदाचित नवा
इतिहास समोर येईल. परंतु, उपलब्ध आणि महत्त्वाच्या अशा निवडक साधनांच्या आधारे
<<<

No dataset card yet

Downloads last month
4